बहुजन ब्रिगेड च्या वतीने सदाशिवनगर येथे सॅनिटायजर, मास्क,डेटॉल साबण या साहित्याचे वाटप

बहुजन ब्रिगेड च्या वतीने सदाशिवनगर येथे सॅनिटायजर, मास्क,डेटॉल साबण या साहित्याचे वाटप

प्रतिनिधी—सदाशिवनगर

बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे व प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिवनगर येथे बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने बहुजन ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा सचिव ऋषीपाल बनसोडे यांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आणि आरोग्यसेविका,तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधव यांना सॅनिटायजर,मास्क,डेटॉल साबण या साहित्याचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन,संचारबंदी लागू केली असल्याने या आपत्ती व्यवस्थापन कार्यकाळामध्ये ग्रामपंचायत, आरोग्यविभाग,तसेच पोलीस खाते हे सर्वसामान्य माणसाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि या लॉकडाउन व संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यासाठी त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या कामावर येत आहेत,त्यामुळे त्यांनाही या कोरोनाची लागण होऊ नये यासाठी खबरदारी साठी आवश्यकता असलेले सॅनिटायजर,मास्क,डेटॉल साबण हे साहित्य वाटप करण्यात आले.संबंधित शासकीय यंत्रणेला हे साहित्य वाटप केल्याने बहुजन ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा सचिव ऋषीपाल बनसोडे यांचे सदाशिवनगर परिसरात कौतुक केले जात आहे.यावेळी विष्णु भोंगळे सर,लोंढे पोलीस पाटिल प्रमोद दळवी,अवी बनसोड,आजीत धांईंजे, सचिन ओवाळ, अंकुश धाईंजे प्रसाद भोसले,इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle