
वेळापूर पोलीस स्टेशन,मा दीपक जाधव साहेब यांच्या विद्यमाने रक्त दान शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र राज्यातील रक्त साठा तुडवड्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दिनांक 10/04/2020 वार शुक्रवार सकाळी १० ते 4या वेळेत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सध्या कोरोना वायरस असल्याने 144 कलम लागू असल्याने कोणत्याही प्रकारची गर्दी न करता हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे कोरोनाच्या लढाई सोबत रक्तदानाचे आव्हान स्वीकारूया कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व सुरक्षित पणे रक्तदान करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाणार आहे. तरी वेळापूर परिसरातील कर्तव्यदक्ष नागरिकांना विनंती आहे की वेळापूर सह वेळापूर परिसरातील सर्व व रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा. वेळापूर पोलीस स्टेशन वेळापूर यांच्या वतीने सर्व लोकांना वेळापूरआसंपासच्या गावातील व परिसरातील सर्व नागरिकांना आव्हान करतो कि सर्वांनी करोना या रोगाला रोखण्यासाठी रक्तपुरवठा करण्यासाठी कमी पडल्याने आदेश दिला आहे तरी वेळापूर पोलिस स्टेशनचे मा. दिपक जाधव साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व नागरिकांनी व तरूण युवकांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे असे बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस पिनू भाऊ येडगे यांनी सांगितले.