मारकडवाडी ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण गावामध्ये घरोघरी सेनीटायझरचे केले वाटप

मारकडवाडी ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण गावामध्ये घरोघरी सेनीटायझरचे केले वाटप

प्रतिनिधी- सचिन रणदिवे

संपूर्ण देशांत कोरोना या संसर्गजन्य आजाराची साखळी तोडण्यासाठी गेली 14 दिवसापासून लॉक डाऊन चालू असतानाच संपुर्ण देशातील शासकीय आरोग्य यंत्रणा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र आरोग्य सेवेचे काम करीत आहे . याच पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामपंचायत यांनी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्याचे ठरवले आहे त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये कोरोनाबरोबर कोणताही रोग गावामध्ये पसरू नये यासाठी औषध फवारणी केली तसेच गेली दोन-तीन दिवसापासून मारकडवाडी येथील लोकांना घरोघरी जाऊन सेनिटायझर चे वाटप केले जात आहे

त्याचबरोबर मारकडवाडी ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक यांच्या वतीने अजून काही नवीन उपाय योजना राबवता येतील या अनुषंगाने प्रयत्न चालू आहेत त्याच बरोबर सर्व लोकांना वेळोवेळी सूचनांचे पालन करण्यात येत आहे सेनिटायझरि चे वाटप करताना सरपंच अमित वाघमोडे पाटील,उपसरपंच छाया विजय वगरे, ग्रामसेवक सागर गोरे,सर्व सदस्य, आरोग्य सेवक,आरोग्य कर्मचारी तसेच क्लार्क शामराव शेंडगे, शिपाई सचिन जानकर,तसेच सफाई कामगार वनिता साधु साठे, यांनी अथक परिश्रम घेऊन घरोघरी सेनिटायझर वाटप केले तसेच तालुका स्तरावरून मारकडवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना जनजागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle