
नातेपुते पोलिस स्टेशनच्या हाद्दीत मोटार सायकल,चारचाकी घेऊन फिरणारांनवर होणार गुन्हे दाखल:- स पो नि युवराज खाडे
प्रतिनिधी–सचिन रणदिवे
कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात व जिल्ह्यात कोरोना व्हायरस पोहोचलेला आहे. नातेपुते पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांनी पोलिसांच्या आवाहनाला अत्यंत चांगला प्रतिसाद देऊन बॉर्डरचे छोटे मोठे रस्ते सील केलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडे कोरोना व्हायरसचा शिरकाव होऊ शकला नाही. चांगले काम करणार्या सर्व गावकऱ्यांचे हार्दिक आभार नातेपुते पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोरोना व्हायरस प्रतिबंधाच्या संदर्भाने गस्त घालत असताना अजूनही काही लोक विनाकारण मोटारसायकल वरती फिरताना आढळून येत आहेत. त्यांना विचारपूस करता अत्यंत क्षुल्लक कारणे सांगतात आणि त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना कोरोना व्हायरसचे काही देणे घेणे नाही असे लक्षात येते. नातेपुते पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येअशा विनाकारण फिरणाऱ्या लोकांमुळेच परिस्थिती बिघडू शकते त्यामुळे आत्ता पोलिसांची आणखी तीव्र गतीने कारवाई सुरू होत आहे. १) आजारी, वृद्ध, गरोदर स्त्रिया, अपंग व्यक्ती व्यतिरिक्त कोणत्याही कारणास्तव दोन किलोमीटरच्या आतील अंतरासाठी कोणलाही दुचाकी किंवा चारचाकी मधून प्रवास करायला परवानगी दिली जाणार नाही. २) किराणा माल, औषधे आणणे वगैरे कामे करण्यासाठी दोन किलोमीटरच्या आत पायी चालत जावे. ३) वरील कारणासाठी दुचाकी किंवा चारचाकी वाहन वापरायचे असल्यास स्वतःचे ड्रायव्हिंग लायसन, गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र व इन्शुरन्स भरल्याचे सर्टिफिकेट सोबत ठेवावे. ४) वरील सूचनांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त केली जातील, तसेच वाहनचालकांना देखील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 प्रमाणे डिटेन करण्यात येईल. ५) रोजी सकाळी बरेच लोक ग्रुपने मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याने चाललेले दिसून आले. उद्यापासून ग्रुपने मॉर्निंग व इविनिंग वॉक करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई केली जाईल. वरील सर्व प्रकारच्या कारवायांमध्ये नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून या कारवाया तमाम नागरिकांच्या कोरोना व्हायरस पासून बचाव व संरक्षण करण्यासाठी आहेत. त्यामुळे वाहन व लोकांना सोडण्यासाठी कृपया कोणीही हस्तक्षेप करणार नाही अशी अपेक्षा आहे. वाय.आर खाडे सहा.पोलीस निरीक्षक नातेपुते पोलीस ठाणे