मौजे खेड भाळवणी येथे प्रत्येक कुटुंबाला मोफतभाजीपाला , धान्यवाटप

“मौजे खेड भाळवणी येथे प्रत्येक कुटुंबाला मोफतभाजीपाला , धान्यवाटप,”

प्रतिनिधी-सचिन रणदिवे

पंढरपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष, मानवता धर्माची साक्ष देणारे उपविभागीय अधिकारी माननीय सचिन ढोले साहेब यांचे आवाहनानुसार व मार्गदर्शनाखाली गावातील सर्वच कुटुंबाला पाचशे किलो वांगी, 500 किलो बटाटे, 1000 किलो कोबी, 1000 किलो टोमॅटो, तसेच शेवग्याच्या शेंगा, इत्यादी मोफत भाजीपाला प्रत्येक कुटुंबाला घरपोच वाटप करण्यात आला. कोरोना या महामारी विरुद्ध लढा देण्यासाठी जी ग्रामस्तरीय समिती तयार करण्यात आली त्यांचं यामध्ये मोलाचे योगदान लाभले. तसेच गावातील वीस गरीब कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, गोडेतेल एक किलो, साखर पाच किलो अशा पद्धतीने धान्य वाटप देखील करण्यात आले. हा उपक्रम राबवण्यासाठी गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली. तसेच प्रशासनातील तलाठी कौलगे भाऊसाहेब, कृषी सहाय्यक फडतरे भाऊसाहेब, व ग्रामसेवक नरसाळे भाऊसाहेब यांचेही मोलाचे योगदान लाभले. प्रत्येक गल्ली मध्ये व वाडीवस्तीवर जाऊन सदरचा भाजीपाला वाटप करण्यात आला. यासाठी गावातील कर्तव्यदक्ष सरपंच जयसिंग मस्के, उपसरपंच पोपट घालमे, राजेश पवार सर, मा. सरपंच शहाजी पवार, मा.उपसरपंच शरद पवार,समाधान पवार, बाबा पवार, अरविंद चव्हाण, शहाजी साळुंखे,सोमनाथ साळुंखे व आर .डी .पवार सर व इतर ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle