बहुजन ब्रिगेडच्या वतीने उदय कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रतिनिधी—माळशिरस—माळशिरस येथील संत सावता माळी मंगल कार्यालय येथे बहुजन ब्रिगेड संघटनेचा अभूतपूर्व असा मेळावा घेण्यात आला होता, त्या मेळाव्यामध्ये संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी माळशिरस विधानसभा बहुजन ब्रिगेड संघटना कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते.
त्याचप्रमाणे आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांचा संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या उपस्थितीत माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला,यावेळी अनिल साठे,धवल कांबळे,विकास बनसोडे इत्यादी उपस्थित होते.