करमाळ्यातील पालावरच्या कुटुंबांना ‘अॉरट्स’चा आधार —– किराणा साहित्याचे वाटप

करमाळ्यातील पालावरच्या कुटुंबांना ‘अॉरट्स’चा आधार —– किराणा साहित्याचे वाटप

करमाळा, दि. ७- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असताना भटकंती करणाऱ्या कुटुंबातील हातावरचे पोट असणारे काही नागरिक तात्पुरती पाले उभारुन शहर परिसरात वास्तव्यात आहेत. सदर कुटुंबांची गरज ओळखून अॉरटस स्मार्ट डेव्हलपर्स प्रा. लि. च्या वतीने किराणा साहित्याचे वाटप उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

अॉरटसचे व्यवस्थापकीय संचालक मुबारक कोरबू यांच्या प्रेरणेतून तहसीलदार समीर माने, सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाटप करण्यात येत आहे. अॉरटस समुहातील सचिन शिंदे, संदिप जोरे यांच्यासह त्यांचे सहकारी वाटपाचे नियोजन करत असून या वाटप उपक्रमाचा शुभारंभ डॉ. अमोल घाडगे, पत्रकार किशोरकुमार शिंदे, दिपक गायकवाड, तोसिफ मणेरी, योगेश गानबोटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी शहर परिसरातील मोकळ्या जागांवर तात्पुरती पाले उभारुन वास्तव्य करणाऱ्या ३८ कुटुंबांना एक महिना पुरेल अशा किराणा साहित्याचे वाटप केले गेले. प्रत्येक कुटुंबाला दिलेल्या सदर साहित्यामध्ये पाच किलो गहू, तीन किलो तांदूळ, दीड किलो साखर, अर्धा किलो तुरदाळ, एक किलो तेल, एक किलो शेंगदाणे, एक किलो मीठ, हळद, तिखट पाकिट, दोन डेटॉल साबण, दोन कपड्याचे साबण, टुथपेस्ट, खोबरेल तेल बाटली अशा जीवनावश्यक साहित्याचा समावेश आहे. याप्रसंगी बोलताना अॉरटसचे सचिन शिंदे यांनी सद्याच्या काळात हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य पुरविणे ही महत्वाची गरज आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार समीर माने, सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्या सुचनांवरुन अॉरटसचे प्रमुख मुबारक कोरबू यांच्या मार्गदर्शनाखाली किराणा साहित्याचे वाटप उपक्रम हाती घेतला असून एकूण शंभर ते सव्वाशे गरजू कुटुंबापर्यंत मदत पोहचविणार आहोत. सदर उपक्रमाचे डॉ. अमोल घाडगे, पत्रकार किशोरकुमार शिंदे यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle