
आधार प्रतिष्ठान च्या वतीने पोलीसांना सेफ्टी कीटचे वाटप
प्रतिनिधी— सचिन रणदिवे
आधार प्रतिष्ठान च्या वतीने माळशिरस पोलिस स्टेशन,सोलापूरमधील विजापूर नाका पोलिस चौकी या ठिकाणी कोरोना साथीच्या काळामध्ये त्यांच्या संरक्षणासाठी सेफ्टी किट फेस शिल्डरर्स, मास्कचे वाटप करण्यात आले, माळशिरस पोलिस स्टेशनमध्ये 70 पोलीस अधिकारी यांना सेफ्टी किट फेस शील्डर चे वाटप करण्यात आले, यावेळी डी.वाय.एस.पी. राजगुरू साहेब, पोलिस निरीक्षक गोल्डे साहेब, नगरपंचायतचे मुख्यकार्यकारी अधिकारी वडजे साहेब, पोलीस कर्मचारी ,शामराव बंडगर, अभिनंदन देशमाने ,अवधूत जमदाडे आदी उपस्थित होते.गोल्डे साहेब बोलताना म्हणाले की आधार प्रतिष्ठानचे काम अतिशय कौतुकास्पद आहे, राजगुरू साहेब यांनी ही आधार प्रतिष्ठानचे कौतुक केले आणि पुढील आधारच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या, या उपक्रमास शामराव बंडगर, डॉ वर्षा पाटील, संजय बंडगर, वर्षा बोत्रे, अभिनंदन देशमाने ,संतोष डगळे असिफ शेख, वैशाली गुजरे, मयुरी पाठक, पल्लवी गोखले, डॉ. महेंद्र खरात, प्रसाद पारेख, अफरिन शेख यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.