
राष्ट्रवादी व बहुजन ब्रिगेडच्या वतीने सलग चौथ्या दिवशी दहा कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप
प्रतिनिधी–सचिन रणदिवे
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी सलग चौथ्या दिवशी अकलूजमधील क्रांतिसिंहनगर येथील दहा कुटुंबाला प्रत्येकी पाच किलो गहू,तीन किलो तांदूळ,एक किलो साखर,खारीचे दोन पुडे या वस्तूंचे वाटप केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या हस्ते धान्य व साखर वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,बहुजन युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे,साहिल अडगळे इत्यादी उपस्थित होते. कोरोना च्या पार्श्वभूमीवर ज्या गरीब,गरजू,निराधारांना व खरोखरच ज्यांना जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे अशाच लोकांना आज सलग चौथ्या दिवशीही किरण साठे यांनी अकलूजमधील क्रांतिसिंहनगर येथील दहा कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले व आपले समाजाला मदत करण्याचे कार्य चालूच ठेवले आहे,त्यामुळे किरण साठे यांचे जनतेतून समाधान व्यक्त होताना दिसत आहे.