
श्री गणेश प्रतिष्ठान नातेपुते यांच्या वतीने औषध फवारणी
प्रतिनिधी- सचिन रणदिवे
संपूर्ण देशांत कोरोना या संसर्गजन्य आजाराची साखळी तोडण्यासाठी गेली दहा दिवसापासून लॉक डाऊन चालू असतानाच संपुर्ण देशातील शासकीय आरोग्य यंत्रणा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र आरोग्य सेवेचे काम करीत आहे . याच पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे श्री गणेश प्रतिष्ठान नातेपुते यांच्यावतीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नातेपुते येथील दळवी गल्ली शेख गल्ली, धनगर गल्ली, सम्राट चौक, बडवे गल्ली, अहिल्यादेवी चौक,कोष्टी गल्ली,बाजार रोड या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली व तसेच श्री गणेश प्रतिष्ठान तर्फे सर्वांना घराबाहेर पडू नका काळजी घ्या अशी विनंती करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष मल्हारी गवळी, उपाध्यक्ष आदेश पवार व सर्व सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.