
दौंड तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य दुकानातून धान्य द्या त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य
प्रतिनिधी—दौंड
त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दौंड तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळणे बाबत चे निवेदन मा. श्री छगन चंद्रकांत भुजबळ साहेब मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक यांना ई-मेल द्वारे पाठवण्यात आले आहे दौंड तालुक्यातील सामान्य व गोरगरीब जनतेला प्रत्येक गावातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य देण्यात यावे तसेच काही सामान्य गोरगरीब जनतेने आपली रेशन कार्ड विभक्त व नवीन काढले आहेत ते रेशनींग कार्ड ऑनलाइन झाली नाहीत तर काही लोक दुसर्या राज्यातून कामासाठी आले आहेत त्यांनाही आधार कार्ड पाहून स्वस्त धान्य मिळावे या सामान्य गोरगरीब जनतेला धान्य मिळाले नसल्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे तरी मा.तहसीलदार साहेब आपण सामान्य गोरगरीब जनतेचा विचार करावा व दौंड तालुक्यातील सामान्य गोरगरीब जनतेला धान्य न मिळता श्रीमंत मोठ्या धनदांडग्या लोकांना धान्य मिळत आहे आमचा त्यालाही विरोध नाही त्यांनाही धान्य द्या त्यांच्याबरोबर सामान्य गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य मिळावे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्रिदल सैनिक सेवा संघ यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की दौंड तालुक्यात जो रेशनिंग दुकानदार धान्य देत नसेल तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला धान्य देण्याची सोय करू असे बोलताना त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांनी सांगितले.