
स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस यांच्यावतीने माळशिरस तालुक्यामध्ये विविध उपक्रम
प्रतिनिधी—सचिन रणदिवे
स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका यांच्यावतीने माळशिरस तालुक्यातील निमगाव (म), खुडुस,कांचन नगर,माळशिरस पानीव याठिकाणी सर्वसामान्य कुटुंबांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गहू व तांदूळ वाटप करण्यात आले.

तसेच माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांना व माळशिरस पोलीस स्टेशन माळशिरस यांनाही हॅन्डवॉश लिक्विड, मास्क, सॅनीटायझर, चे वाटप करण्यात आले यावेळी स्वाभिमानी चे मार्गदर्शक टी,एस,काळे,(साहेब ), भिमराव फुले, मगन काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुकाध्यक्ष अजित बोरकर,गोपाळ काका घार्गे, अमरसिंह माने देशमुख, अजितराव कोडग, दशरथ मोरे पाटील, अतुल पिसे,सागर काळे,(सर) समाधान काळे,साधु राऊत,आहिल पठाण, व पदाधिकारी उपस्थित होते.
