अन्न धान्य देण्याची आर्त हाक देणाऱ्या व्यक्तीच्या मदतीला किरण साठे आले धावून

अन्न धान्य देण्याची आर्त हाक देणाऱ्या व्यक्तीच्या मदतीला किरण साठे आले धावून

प्रतिनिधी—अकलूज

कोरोना व्हायरस ने देशामध्ये हैदोस घातल्यामुळे लॉक डाउन व संचारबंदी करण्यात आलेली असताना सर्वसामान्य व गोरगरीब व निराधारांना हाताला काम नसल्याने त्यांना स्वतःचे पोट भरण्यासाठी आवश्यक असलेले अन्न,धान्य,मिळेनासे झाले असल्याने त्याचे अतोनात हाल सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिनांक १ एप्रिल रोजी अनेक गरजू,गरीब,व निराधार व खरोखरच ज्या लोकांना गरज आहे अशा लोकांना अन्न,धान्य वाटप केले होते,त्याच अनुषंगाने काल संध्याकाळी किरण साठे यांना एक फोन आला की आम्हाला खायला अन्न धान्य,नाही तरी आम्हाला खायला पीठ,व इतर साहित्य देऊन मदत करा अशी आर्त हाक देणारी घटना घडली त्याच व्यक्तीला आज किरण साठे यांनी त्यांच्या अकलूजमध्ये असलेल्या घरी जाऊन पाच किलो पीठ,तीन किलो तांदूळ,अर्धा किलो गोड तेल,तीन साबण,एक किलो डाळ,असे साहित्य देऊन त्याची भूक भागविण्याचा प्रयत्न केला आहे.

चौकट

मला काल एक आर्त हाक देऊन मदत मागणाऱ्या व्यक्ती चा फोन आला आणि मी ठरवले की कोणत्याही परिस्थितीत या व्यक्ती ला मदत करायची आहे,एखाद्या व्यक्तीचा जीव जाणणे व त्यांच्या पोटामध्ये अन्न घालणे या पेक्षा मोठं सामाजिक काम कोणतं असू शकत म्हणून मला जेवढे शक्य आहे ठेवढि मदत मी आज त्या व्यक्ती ला केली आहे,या कुटुंबातील व्यक्ती ला मदत केल्याने मनाला समाधान वाटत आहे.

किरण साठे –सरचिटणीस–सोलापूर जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom