
३१३ कुटुंबाना घरपोच जेवण,तर ४५ कुटुंबाना धान्य वाटप
राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडचा उपक्रम
प्रतिनिधी—कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशामध्ये लॉकडाउन व संचारबंदी करण्यात आली असल्याने अकलूजमधील ज्या लोकाना रेशन कार्ड नाहीत,ज्या लोकांना खरोखरच गरज आहे अशा व गोरगरीब,गरजू,निराधारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला असून आज अकलूजमधील व यशवंतनगर भागातील ४५ कुटूंबाना दिनांक १२ एप्रिल रोजी प्रत्येकी ५ किलो गहू,तीन किलो तांदूळ असे धान्य वाटप केले.
त्याच अनुषंगाने किरण साठे यांच्या वतीने अकलूज,यशवंतनगर,माळेवाडी,संग्रामनगर,या गावामधील गरजू,गरीब,निराधारांना घरपोच जेवण देण्याची योजना दिनांक ८/४/२०२० पासून सुरू करण्यात आली आहे,त्या योजनेच्या माध्यमातून पाचव्या दिवशी ३१३ कुटूंबाना घरपोच जेवण(चपाती,भात, भाजी) देण्यात आले आहे. ही योजना दिनांक १५ एप्रिल पर्यंत चालू ठेवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी माहिती दिली. सदर योजना चालू ठेवण्यासाठी काही दानसुर व्यक्तीनी मदत केली आहे,असेही साठे यांनी सांगितले.