
श्रीपूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किरण साठे यांचा सत्कार
आज २४ तास –प्रतिनिधी—श्रीपूर—राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी किरण साठे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने श्रीपूर येथे शरद पवार यांचे सुशासन व सवांद हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठान चे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह लाटे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव अनिकेत मुंडफने,आर पी आय चे तालुका अध्यक्ष नरेंद्र भोसले,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राहुल बिडवे,शिवसेनेचे नितीन वाघमारे,पत्रकार दादा माने,सागर कोळी,व अनेक मान्यवर उपस्थित होते.
किरण साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यापासून प्रामाणिकपणे भूमिका मांडली आहे,तसेच पक्षावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याचे काम किरण साठे यांनी केल्याने पूर्व भागातील कार्यकर्त्यांना अभिमान वाटत असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आल्याचे विक्रमसिंह लाटे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव अनिकेत मुंडफने यांनी सांगितले.