वेळापूर येथील डी फोर कॅनॉलच्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी १६ मार्च पासून बेमुदत अर्धनग्न आंदोलन–किरण साठे

वेळापूर येथील डी फोर कॅनॉलच्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी १६ मार्च पासून बेमुदत अर्धनग्न आंदोलन–किरण साठे

प्रतिनिधी—माळशिरस—वेळापूर येथील डी फोर कॅनॉलच्या कामची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी यांना त्वरित निलंबित करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावे या मागणीचे निवेदन बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी लघु पाटबंधारे विभाग क्र १ वारणा डावा तीर कालवा उपविभागीय क्र ३ माळशिरस चे उपविभागीय अभियंता श्री धायगुडे साहेब यांना दिले असून संबंधित मागणीची त्वरित दखल न घेतल्यास दिनांक १६/३/२० पासून बेमुदत अर्धनग्न ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.सदर निवेदन श्री नरसिंह ठवरे यांनी स्वीकारले.

सदर निवेदनात म्हटले आहे की,आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वेळापूर ता.माळशिरस येथील हॉटेल सिद्धीच्या बाजूला असलेल्या डी फोर कॅनॉलचे काम हे निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याची शक्यता नाकारता येत नसून सदर काम हे नियम,अटी,शर्ती च्या व निविदेच्या अनुषंगाने झालेले दिसून येत नाही,तसेच या कामामध्ये वापरण्यात आलेले साहित्य हे शासकीय प्रयोगशाळा येथून तपासून काम केले आहे का? हा ही प्रश्न उपस्थित होत आहे,कारण हे झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे,त्यामुळे सदर कामाची चौकशी ही क्वालिटी कंट्रोल मार्फत करवी,आपल्या विभागामार्फत केल्या जाणाऱ्या कामामध्ये अनियमितता असल्याने अनेक मोठ्या नेत्यांनीही आपल्या कामाच्या संदर्भात आंदोलने केली आहेत,त्यामुळे सदर कामामध्ये अनियमितता व काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचे चौकशी केल्यानंतर सिद्ध होणार आहे,ते सिद्ध झाल्यानंतर संबंधित अधिकारी यांना निलंबित करावे व ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे या मागणीसाठी १६/३/२०२० रोजी पासून अर्धनग्न बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom