लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानी बैठकांना जाणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रतिनिधी : : शासकीय बैठकासाठी लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानी जाणाऱ्या माळशिरस तालुक्यातील अधिकाऱ्यावरती आणि कर्मचारी यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किरण साठे आणि जिल्हा उपाध्यक्ष अंबादास ओरसे यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्यामार्फत निवेदन पाठवून केली आहे.निवेदन अव्वल कारकून एस एम चंदनशिवे यांनी स्वीकारले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे राज्य उपाध्यक्ष अशोक गायकवाड,सचिव तुकाराम साळुंखे,सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,जिल्हा उपाध्यक्ष अंबादास ओरसे,अल्पसंख्याक सरचिटणीस साजिद सय्यद,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर,मान काळे,ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख,शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अविनाश सोनवणे,इरफान बागवान,रहीम शेख,फरीद बागवान,जुबेर बागवान,यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यामधील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे माळशिरस तालुक्यामध्ये असलेले लोकप्रतिनिधी यांच्या निवासस्थानी,बंगल्यावरती घेतलेल्या बैठकीला उपस्थित राहत आहेत.हे शासनाच्या नियमांमध्ये बसत नसून ज्या लोकप्रतिनिधींना विविध विभागाच्या बैठका घ्यायच्या आहेत त्या लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना स्वतःच्या निवासस्थानी व बंगल्यावर न बोलवता शासकीय विश्रामगृह त्याच पद्धतीने शासकीय कार्यालयात बैठका घ्याव्यात असे निवेदनात म्हटले आहे.
बैठका आयोजित केल्यानंतर शासनाचा प्रोटोकॉल मोडून तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या बंगल्यावर आणि निवासस्थानी मीटिंग ला जाणाऱ्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करून अधिकारी लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानी आणि बंगल्यावर दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.
