
राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडच्या योजनेमध्ये एकूण ८६१कुटुंबाना मदत-किरण साठे
पिलीव व्रत्तसेवा
—राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडच्या वतीने ३१मार्च पासून ते १५ एप्रिल पर्यत अकलूज, माळेवाडी,यशवंतनगर,संग्रामनगर,माळीनगर या भागातील गोरगरीब,गरजू,निराधारांना,व ज्या लोकांना रेशनकार्ड नाहीत अशा गरजवंतांना मोफत धान्य वाटपाची योजना चालू केली होती,तसेच त्या योजनेमध्ये भर म्हणून दिनांक ८ एप्रिल पासून घरपोच जेवण देण्याची योजना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनीआपल्या सहकार्याच्या सहकार्याने चालू केली होती.आणि सदर दोन्ही योजना १५ एप्रिल पर्यत चालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांच्या योजनेच्या माध्यमातून ३१मार्च ते १५एप्रिल या दरम्यान ४२३ कुटुंबाना प्रत्येक कुटुंबाला पाच किलो गहू याप्रमाणे एकूण २११५ किलो गहू, तसेच प्रत्येक कुटुंबाला तीन किलो तांदूळ याप्रमाणे एकूण १२६९ किलो तांदूळ असे धान्य वाटप करण्यात आले.आणि ८ एप्रिल पासून सुरू करण्यात आलेल्या घरपोच जेवण या योजनेमध्ये एकूण ४३८ कुटुंबाना घरपोच जेवण देण्यात आले,या योजनेसाठी १,९७१ किलो गहू,९८५.५किलो तांदूळ,व भाजीसाठी ४९२.७५ किलो वेगवेगळ्या डाळी एवढे धान्य व डाळी वापरण्यात आल्या
किरण साठे यांनी १५ एप्रिल पर्यंत अकलूज,माळेवाडी,यशवंतनगर,संग्रामनगर या भागातील गरजू,गोरगरीब, निराधारांना व ज्यांना रेशन दुकानात माल मिळत नाही अशा व खरोखरच ज्यांना गरज आहे अशा एकूण ४२३ कुटुंबाना धान्य वाटप केले.त्याचबरोबर घरपोच जेवण या योजनेच्या माध्यमातून एकूण ४३८ कुटुंबाना घरपोच जेवण देण्याची योजना १५ एप्रिल पर्यंत पार पाडली आहे,या योजनेमध्ये मोठया प्रमाणावर अनिल साठे,सोमनाथ शेळके,सचिन मोरे,धवल कांबळे,उदय कांबळे,सागर कोळी,सुनील साठे,साहिल अडगळे,आशुतोष साठे,निलेश साठे, व अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.किरण साठे यांनी ही योजना राबवून खरोखरच ज्यांना मदतीची आवश्यकता आहे अशा लोकांना मदत केल्याने त्यांचे समाजातून कौतुक होताना दिसत आहे.तसेच या योजनेसाठी काही दानशूर व्यक्तीनी मदत केली आहे ,मात्र अजून काही दानसुर व्यक्तीनी मदत केल्यास,ही योजना पुन्हा २० तारखेपासून सुरू करण्याचा विचार करणार असल्याचे सांगून ज्यांना या अडचणीत सापडलेल्या गरजू लोकांना मदत करायची असेल तर माझ्याशी 9673664444,839045999,9049047747 या नंबर संपर्क साधावा असे आवाहन किरण साठे यांनी केले आहे.