राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप,महाराष्ट्र विकास सेना पक्षामध्ये प्रमुख लढत!

दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये होणाऱ्या हायव्होल्टेज लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष

प्रतिनिधी: महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून दहिगाव जिल्हा परिषदेच्या गटामध्ये निवडणुकीसाठी माळशिरस तालुका संघटक अविनाश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आमदार उत्तमराव जानकर यांचा मुलगा जीवन जानकर,भाजप कडून माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.माळशिरस तालुक्यातील जनतेमध्ये दहिगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा सुरू असताना महाराष्ट्र विकास सेना पक्षाने निवडणुकीत एंट्री केल्याने दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या हायव्होल्टेज लढतीमध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार आहे,या निवडणुकीत काटे की टक्कर होणार असून या जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या,दहिगाव,कळबोली, एकशिव,कुरबावी या गावात शाखा असून त्यांचे संघटन या जिल्हा परिषद गटामध्ये आहे त्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom