राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला यश मिळाले–पिनू येडगे
प्रतिनिधी—वेळापूर—वेळापूर मधील भारनियमनाविरोधात म.रा.विद्युतपारेषण,कं.मर्यादित उपकेंद्र,वेळापूर.यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पिनू येडगे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबा जाधव यांनी निवेदन दिले होते.
सदर निवेदनामध्ये वेळापूर परिसरातील सर्व वाडी वस्त्यांवरील (आडत वस्ती,म्हेत्रे मळा व बनकर वस्ती)येथे आपल्या विभागामार्फत चालू केलेल्या भारनियमनामुळे येथील शेतकरी त्रस्त झालेले आहेत, लाईट येण्याचे व जाण्याची वेळ चुकीची असल्याने शेतकऱ्यांना लागवडीसाठी वेळेवर व मुबलक प्रमाणात वीज न मिळाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झालेली आहे. असे असताना आपण रात्री अपरात्रीची लाईट येण्याची वेळ देऊन शेतकऱ्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे त्यास कोण जबाबदार असेल? त्यामुळे येथील थ्री फेज लाईट च्या वेळेमध्ये त्वरित बदल करावा व थ्री फेजचे कनेक्शन बंद झाल्यानंतर त्वरित सिंगल फेज लाईट चालू करावी,त्याला अनुसरून या वेळापूर विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पिनू येडगे यांना लेखी पत्र देऊन थ्री फेज कनेक्शन बंद झाल्यास त्वरित सिंगल फेज कनेक्शन येत्या आठ दिवसांत चालू करण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच उर्वरित मागण्या या राज्य पातळीवरील असून त्याचे निवेदन वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याचे ही आश्वासन दिले,असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचे पिनू येडगे यांनी सांगितले,
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरणसाठे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पिनू येडगे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा जाधव,सागर कोळी बहुजन नेते काकासाहेब जाधव शिवसेना वेळापूर शहर अध्यक्ष आपा कांबळे युवक नेते हनंमत वायदंडे माजीद मुलाणी राहूल सराटे शेतकरी भागवत गायकवाड डाॅ धनंजय म्हेत्रे बापूसाहेब आडत मोहन वाघे अब्दुल शेख संजय पनासे अशय सराटे धनाजी वाघ भैय्या चंदनशिव चोरमले सर गणेश पिसे व शेतकरी बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.