राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज प्रांत कार्यालसमोर तीव्र ठिय्या आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज प्रांत कार्यालसमोर तीव्र ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी—अकलूज—राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या कार्यालसमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनामध्ये परतीच्या पावसाने माळशिरस तालुक्यातील शेकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे,त्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी.आणि ती नुकसान भरपाई बेरर चेकच्या स्वरूपात देण्यात यावी,
माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे राहिलेले पंचनामे त्वरित करावेत,
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन,शेतकऱ्यांचे सरसकट सातबारे कोरे करावे,
शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ करावे,
महाराष्ट्रातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना हवे तोपर्यंत मोफत शिक्षण देण्यात यावे,या मागण्या करण्यात आल्या सदर आंदोलनाचे निवेदन अव्वल कारकून ए टी जाधव यांनी स्वीकारले,या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,माजी जि प सदस्य अशोक गायकवाड,माजी जि प सदस्य बाळासाहेब सपताळे,जनसेवा संघटनेचे आण्णासाहेब शिंदे,जिल्हाउपाध्यक्ष प्रभाकर सर इंगळे देशमुख,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पिनू येडगे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबा जाधव,ओबीसी तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे,बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर,दलित महासंघाचे उमाजी मिसाळ,संतोष खंडागळे,रघुनाथ साठे,पिंटू एकतपुरे,सागर कोळी,बंडू एकतपुरे,सोमनाथ शेळके,सचिन भवर,सागर भवर,भैय्या कुचेकर,विक्रम साठे,धवल कांबळे,इरफान बागवान,हनुमंत वायदंडे, इतर व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom