माळशिरस तालुक्याला कोवीड लस जादा देणेची अजय सकट यांची मागणी

माळशिरस तालुक्याला कोवीड लस जादा देणेची अजय सकट यांची मागणी

माळशिरस : प्रतिनिधी :माळशिरस तालुक्याला सध्या कमी लस पुरवठा होत असून त्यामुळे नागरिक व आरोग्य कर्मचारी यांच्यात वाद निर्माण होत आहेत यामुळे तालुक्याला कोवीड लस जादा देणेची माळशिरस पंचायत समितीचे सदस्य आहेत व विरोधी पक्षनेते अजय सकट यांनी जिल्हाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा व लस नियोजन अधिकारी डॉ अनिरुध्द पिंपळे यांच्याकडे मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे सदस्य व विरोधी पक्षनेते अजय सकट यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड लसीची गरज असून तालुक्यात लसीकरण झाल्यास हा संसर्ग कमी होण्यास मदत होणार आहे तालुक्याची लोकसंख्या साडेपाच लाख असून सध्या लस बाराशे मिळत आहेत आपणास विनंती करतो की दररोज आपण ५००० लस दिली तरी एक मे पासून अठरा वर्षा पासून पुढील सर्वांना लसीकरण होणार असल्याने लगेच कमी पडणार आहेत तसेच सध्या 45 वर्षाखालील व्यक्तींना लस देण्यासाठी लस किमान पाच हजार प्रति दिवस देण्यात यावी तरच तालुक्यात कोवीडचा संसर्ग कमी होईल तालुक्यात १२ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३ग्रामीण रुग्णालयात हे लसीकरण होत आहे भविष्यात अजून केंद्र वाढणार आहेत तरी आपण योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom