महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण किरण साठे यांच्या पाठपुराव्यामुळेच-उदय कांबळे

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण किरण साठे यांच्या पाठपुराव्यामुळेच-उदय कांबळे

प्रतिनिधी–अकलूज–अकलूजमध्ये महात्मा फुले यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण व त्यांच्या शेजारी सावित्रीबाई फुले यांचे स्मारक राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांच्या पाठपुराव्यामुळेच झाल्याचे बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी सांगितले.

अकलूजमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांच्या पाठपुराव्यामुळेच उभा राहिले आहे,किरण साठे यांनी गेली ७ते८वर्ष विविध प्रकारची आंदोलने केली व सतत महात्मा फुले यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करून त्यांच्या शेजारी सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभा करावे ही मागणी लावून धरली होती.त्याचीच दखल घेऊन अकलूज ग्रामपंचायतने ३जानेवारी रोजी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभा करून त्याचे सुशोभीकरण करण करून या स्मारकाचे अनावरण केले आहे.

तमाम महाराष्ट्र राज्यातील माळी समाजाचे आशास्थान व इतर समाजाचे प्रेरणास्थान असलेले महात्मा फुले यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करणे व त्यांच्या शेजारी सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभा राहण्यामाघे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांचा सिंहाचा वाटा असून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे अनुयायी व माळी समाजामध्ये किरण साठे यांच्या कार्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली असून त्यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले जात आहे,असे उदय कांबळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom