मनसे चे अविराज माने यांचे इंदापूर सां.बा विरोधात आंदोलन.
प्रतिनिधी : इंदापूर : इंदापूर तालुक्यातील उप अभियंता यांचा कार्यक्षेत्रात येणाऱ्या वकिलवस्ती ते निराभिमा कारखाना कडे ये जा करणाऱ्या रोड चे काम अगदी काही ६ ते ७ महिन्या पूर्वीच नुकतेच झाले असून त्या रोड मध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मटेरियल हे ठेकेदार यांनी वापरलेलं दिसून येत नाही त्यामुळे वकिलवस्ती ते निराभिमा ह्या रोड ची अतिशय दुर्मिळ अवस्था झाली आहे हा रोड पूर्ण पणे उचकटून गेलेला आहे आणि काही ठीक ठिकाणी तर मोठे खडे आणि पाऊसाच्या पाण्यानी रोड चे डांबर खडी ही उचकटून वाहून गेली आहे सदर चे काम हे इंदापूर चे उप अभियंता श्री वैध्य साहेब व शाखा अभियंता श्री साळुंखे साहेब यांचा विभागा मध्ये आहे.
उप अभियंता वैध्य साहेब व शाखा अभियंता साळुंखे यांनी ठेकेदाराला पाठीशी घालून हे काम केले आहे.
तरी आपण ह्या कामाची सखोल चौकशी करून उप अभियंता व शाखा अभियंता यांचावर तात्काळ कडक कार्यवाही करावी व सदर कामाचे ठेकेदार यांना आपण काळ्या यादीत टाकावे. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दि ४ /१/२०२२ रोजी तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे निवेदन मनसे चे इंदापूर तालुका उपाध्यक्ष अविराज माने यांनी पुणे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे
