बहुजन ब्रिगेड संघटनेच्या विविध पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर

बहुजन ब्रिगेड संघटनेच्या विविध पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर

अपंग सेलच्या तालुकाध्यक्षपदी –कुलकर्णी

प्रतिनिधी—अकलूज–बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्री किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत बहुजन ब्रिगेड संघटनेच्या अपंग सेलची स्थापना करण्यात आली. त्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी संघटनेच्या अकलूजमधील बैठकीत केली.त्याचवेळी अपंग सेलच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी यशवंतनगर येथील विजय काका कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.सदर निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते देण्यात आले.

सदर बैठकीत संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सदस्य पदी ऋषीपाल बनसोडे,माळशिरस महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुक्मिणी रणदिवे,माण तालुका अध्यक्ष विलास चंदनशिवे,इंदापूर तालुका उपअध्यक्ष समीर खंडागळे,नातेपुते विभाग प्रमुख सतिश बजबळकर,अकलूज शहर उपाध्यक्ष बंडू कांबळे,तालुका कार्यकारणी सदस्य धनाजी यादव,कण्हेर शहराध्यक्ष राजेंद्र धाइंजे यांच्या निवडी प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आल्या.या बैठकीत पिंपरी ता.माळशिरस येथील जेष्ठ कार्यकर्ते व माजी सरपंच दादा बजबळकर,आप्पा वाघापुरे यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.यावेळी जिल्हा सचिव माऊली धाइंजे, जिल्हा कार्यध्यक्ष सचिन मोरे,तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,सरचिटणीस अभय भोसले,अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा अध्यक्ष उदय कांबळे,पिंटू एकतपुरे,सुदाम आवारे,माऊली पालवे,सूरज मोहिते,मिथुन साठे,सचिन घंबरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom