बहुजन ब्रिगेड संघटनेचा अकलूज नगरपरिषदेला दणका…
अखेर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेला धोकादायक खड्डा बुजवला…
शहराध्यक्ष उदय कांबळे यांच्या प्रयत्नाला मिळाले यश.
प्रतिनिधी : अकलूज : बहुजन ब्रिगेड संघटनेचे युवा आघाडीचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी अकलूजमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आणि अकलूज ते माळीनगर,जुना पंढरपूर रस्त्यावर पडलेला धोकादायक खड्डा तात्काळ दुरुस्ती करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय पंढरपूर,सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज,अकलूज नगरपरिषद यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.
तिन्ही कार्यलयाकडे सतत पाठपुरावा करून बहुजन ब्रिगेड संघटनेचे युवा आघाडीचे शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी तो धोकादायक खड्डा हा बुजविण्यासाठी अकलूज नगरपरिषदेला भाग पाडले आणि तो विषय मार्गी लावला.बहुजन ब्रिगेड संघटनेने हा विषय मार्गी लावण्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना प्रवास करीत असताना आता कोणत्याही प्रकारचा धोका नसून खड्डा बुजवल्यामुळे अपघात होणार नाहीत त्यामुळे वाहनधारकांमधून बहुजन ब्रिगेड संघटनेचे आभार व्यक्त केले जात आहेत.
