प्रति संडास आंदोलनाला मिळाले यश

प्रति संडास आंदोलनाला मिळाले यश

किरण साठेंचा पाठपुरावा ठरला यशस्वी

प्रतिनिधी : अकलूज : अकलूज मधील बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी महर्षी कॉलनी,21 खोल्या जिल्हा परिषद शाळे पाठीमागील सार्वजनिक शौचालय त्वरित दुरुस्त करण्याच्या व नव्याने निर्माण करण्याच्या मागणीसाठी अकलूज नगर परिषदेला प्रति सार्वजनिक शौचालय व संडास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात आले होते.आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व बहुजन ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनस्थळी भेट देवून अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे यांनी या सर्व शौचालयासाठी निधीची मागणी करून आपण सुचवलेल्या सार्वजनिक शौचालय नव्याने निर्मिती करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.

त्याच अनुषंगाने अकलूज नगर परिषदेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस तसेच बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांना लेखी पत्र देऊन आपण मागणी केलेल्या कामापैकी बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी येथील महिला व पुरुषांकरिता सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे,२१ खोल्या पाठीमागील इंदिरा नगर,महर्षी कॉलनी येथे महिला व पुरुषांकरिता सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे ही कामे शासकीय निधीतून मंजूर झालेली आहेत.असे लेखी पत्र दिले आहे.त्यामुळे किरण साठे यांच्या प्रति संडास व शौचालय आंदोलनाला यश मिळाले आल्याचे दिसून येत आहे.किरण साठे नेहमीच अकलूज मधील व माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नावरती आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचं काम करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. शौचालयाच्या कामाला निधी मंजूर झाल्याने त्यांचे अकलूज मधील व माळशिरस तालुक्यातील जनतेतून कौतुक केले जात आहे तसेच या परिसरामध्ये राहणाऱ्या महिलांची आणि पुरुषांची शौचालयासाठी होणारी गैरसोय आता थांबणार असल्याचे किरण साठे यांनी सांगितले.शौचालयाचा प्रश्न सोडवण्यासाठी किरण साठेंनी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला असल्याची चर्चा अकलूजमधील परिसरात चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom