पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर बहुजन ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन
अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांचे कारवाई करण्याचे आश्वासन
१३ मार्चला पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन…बहुजन ब्रिगेड
प्रतिनिधी : सोलापूर : माळशिरस तालुक्यातील माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुडूस गावातील अवैद्य धंदे बंद करून मटक्याचा मालक सलीम शेख यांच्यवरती तडीपार करण्याच्या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले.यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,महेंद्र गायकवाड,प्रेम खरे,विकास केसकर,आनंद भिसे,किशोर गायकवाड,सुजित भोंडवे उपस्थित होते.
आंदोलनकर्ते यांना पोलीस यांच्यामार्फत सोलापूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्याबरोबर भेट घडवून आणली,त्यामध्ये खुडूस गावातील मटक्याच्या धंद्याचा मालक सलीम शेख यांच्यावरती व अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.तात्काळ कारवाई न केल्यास बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर १३ मार्चला आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
