पदवीधरांना बेघर करणारे नेते पदवीधर निवडणुकीचा प्रचार करत आहेत—किरण साठे

पदवीधरांना बेघर करणारे नेते पदवीधर निवडणुकीचा प्रचार करत आहेत—किरण साठे

प्रतिनिधी—सोलापूर—पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून माळशिरस तालुक्यातील एक नेता भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माळशिरस,करमाळा,माढा तालुक्यामध्ये फिरताना दिसत आहे,मात्र त्याच नेत्याने स्वतः चेअरमन असलेल्या पतसंस्थेला व एका कारखान्याला दिवाळखोरीत घालवून त्या पतसंस्थेमध्ये व कारखान्यामध्ये काम करणाऱ्या पदवीधरांना बेघर केले आहे, आणि ते भाजपच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून फिरतायत त्याच्या भूलथापांना कोणी बळी पडणार नाही असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर सरचिटणीस किरण साठे यांनी माळशिरस तालुक्यातील पतसंस्था व कारखाना दिवाळखोरीत घालवणाऱ्या भाजपच्या नेत्यावर केला आहे.

ही निवडणूक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची असल्याने या निवडणुकीत मतदान करणारे मतदार हे सुशिक्षित असतात त्यामुळे आपल्याकडे असलेल्या पतसंस्था व कारखाना दिवाळखोरीत घालवणाऱ्या नेत्याच्या अमिशाला बळी पडणार नाहीत अशी टीका किरण साठे यांनी केली आहे.

एक डिसेंबर रोजी या दोन्ही मतदारसंघासाठी निवडणूकीचे मतदान असून या मतदानादिवशी पदवीधर व शिक्षक मतदार यांनी महविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार यांना आपल्या नंबर एक पसंतीचे मत देऊन विजयी करून आपल्या समस्या हक्काने सोडवण्यासाठी विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom