पंढरपूर ग्रा.पो.स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कदम हवालदार यांच्या चौकशीचे पोलीस अधीक्षक यांचे आदेश

पंढरपूर ग्रा.पो.स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कदम हवालदार यांच्या चौकशीचे पोलीस अधीक्षक यांचे आदेश

बहुजन ब्रिगेडच्या आंदोलनाला मिळाले यश

प्रतिनिधी—सोलापूर–पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कदम हवालदार यांच्यावर कारवाई करून राधा मारुती गेंड यांच्या नातेवाईक यांच्या खिश्यातून पैसे काडून घेणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्या कार्यालयासमोर बहुजन ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश खरे यांनी 9 नोव्हेंबर रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

मौजे कौठाळी ता पंढरपूर येथील राधा मारुती गेंड यांना माहेराला नेण्यासाठी आलेल्या लोकांना मारहाण करून त्यांच्या खिश्यातील 20 हजार रुपये कदम पोलीस यांच्यासमोर काढून घेणाऱ्या आप्पा शिवाजी गोडसे,दत्तात्रय सुखदेव पाटील यांच्यावरही दरोड्याचा गुन्हा दाखल करावा तसेच तसेच राधा गेंड यांच्या नातेवाईक यांना सोडवण्यासाठी आलेल्या जामीनदार यांच्याकडून 11500 रुपये कलम कमी करतो म्हणून व गाडी सोडवण्यासाठी रिपोर्ट व्यवस्थित करतो म्हणून 2 हजार रुपये श्री कदमसाहेब यांनी घेतले आहेत,तसेच राधा मारुती गेंड ह्या आपली फिर्याद देण्यासाठी पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या असता त्यांची फिर्याद न घेणाऱ्या प्रभारी अधिकारी व त्यांना लज्या उत्पन्न होईल अशी शिवीगाळ करणाऱ्या कदम पोलीस यांच्यावर 354 प्रमाणे गुन्हा दाखल करून संबंधित दोन्ही प्रकरणामध्ये प्रभारी अधिकारी व कदम पोलीस यांना आरोपी करून गुन्हा नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावरून तात्काळ आदेश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.

त्याची पोलीस अधीक्षक सौ तेजस्विनी सातपुते यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची नेमणूक केली असल्याने बहुजन ब्रिगेड संघटनेच्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेश खरे यांनी सांगितले.यावेळी जिल्हा सचिव माऊली धाइंजे,सतीश बजबळकर,अमित बजबळकर,विजय काळेल,आप्पा वाघापुरे, इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom