
नितीन पाटील आणि श्रद्धा पाटील यांच्याकडून कोळेगावमध्ये गरजुंना किराणा धान्य वाटप.
कोळेगाव प्रतिनिधी-महेश घाडगे
देशात आलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या शेतमजूर व इतर कामगारांना मदत व छोटासा हातभार म्हणून अलिबाग – रायगड येथील ITDRIVENN Pvt.Ltd. या सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक श्री.नितीन नामदेव पाटील व सौ.श्रद्धा नितीन पाटील यांच्याकडून आज सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव या गावातील गरजू कुटुंबाना किराणा धान्य वाटप करण्यात आले.

श्री.नितीन पाटील हे मूळचे कोळेगावचे तर कंपनीच्या मुख्य संचालिका सौ.श्रद्धा पाटील या रायगड जिल्यातील अलिबाग येथील रहिवाशी आहेत. गेली अनेक वर्षे टाटांच्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत असल्याने रतन टाटांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही आपले करत असताना छोटी का असेना पण देश सेवा करत राहिले पाहिजे. त्या अनुषंगाने आज देशावर आलेल्या या संकट काळात रोजंदारीवर काम करणारे बहुतांश शेतमजूर व कामगार यांचे काम बंद पडले आहे. अशांना आपला हातभार लागावा या उद्देशाने हे किराणा धान्य वाटप करण्यात आले. असे श्रद्धा पाटील यांनी सांगितले. हे किराणा धान्य वाटप *कोळेगावचे पोलीस पाटील श्री.बिभीषण दुपडे तसेच ग्रामस्थ श्री.कैलास दुपडे, श्री.उत्तरेश्वर पारसे, श्री. भारत गेजगे, श्री.नारायण पारसे ,श्री.विलास सावंत, श्री.दत्ता गेजगे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थित करण्यात आले. सदर उपक्रमाचे आयोजन श्री.नितीन पाटील यांच्या सूचनेनुसार कोळेगाव येथील नितीन पाटील युवा मंचाचे पदाधिकारी व कार्यकर्ते किशोर पारसे व अनिकेत पारसे यांनी केले होते.गावाबद्दल असलेली आस्था व प्रेम यामुळे फक्त शुभेच्छांचे बॅनर न लावता व इतर काय चुकीचे करतोय हे सांगण्यापेक्षा या संकटकाळात आपण आपल्या गावातील गरजवंतांसाठी काय केले पाहिजे यासाठी हा छोटासा हातभार आहे. तसेच जास्त गर्दी होऊ नये म्हणून विविध टप्यांमध्ये हे मदतकार्य सुरू राहील.असे नितीन पाटील यांनी मत व्यक्त केले व सर्व उपस्थितीतांचे फोनद्वारे आभार मानले व घरात राहून सरकार व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
शिवाय, सदर धान्य वाटप हे सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसार व सोशल डिस्टनसिंग पाळून केले गेले.