उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर हलली प्रशासनाची यंत्रणा! 

उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर हलली प्रशासनाची यंत्रणा!

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्य केंद्रासह आरोग्य उपकेंद्रांच्या ठिकाणी व आरोग्यवर्धिनी केंद्राच्या ठिकाणी देखील 45 ते 59 वयोगटातील सर्व सरसकट लोकांना कोरोनाचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांनी देखील जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. 1 एप्रिल पासून सर्व ठिकाणी 45 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत.

45 ते 59 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना गावांमध्ये जाऊन ताटकळत बसावे लागते, अथवा एका ठिकाणी गर्दी होत असल्याने आरोग्य केंद्रांबरोबर लसीकरणाची प्रक्रिया वाढवण्यासाठी व वेग वाढविण्यासाठी आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणीदेखील लसीकरणास परवानगी दिली आहे.अर्थात ही परवानगी देत असताना या उपकेंद्रांच्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्रापासून दूर अंतरावर असलेल्या उपकेंद्र, ज्या उपकेंद्रांतर्गत मोठी लोकसंख्या उपलब्ध आहे, ज्या ठिकाणी पुरेशी जागेची उपलब्धता आहे, जिथे निरीक्षण कक्ष, लसीकरण कक्ष, प्रतीक्षा कक्ष यांची सुविधा आहे. अशा ठिकाणी कोविड लसीकरण सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य उपकेंद्रांच्या ठिकाणी कोरोनाचे लसीकरण सुरू होणार आहे. त्याचा फायदा वाड्यावस्त्यांवरील ज्येष्ठ नागरिकांना होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर कोरोनाचे लसीकरणही वेगाने होण्यास यामुळे मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom