उपमुख्यकार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची अजित पवार यांच्याकडे मागणी

उपमुख्यकार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची अजित पवार यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी : सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विभागीय आयुक्त पुणे यांना निवेदन देवून सोलापूर जिल्ह्याच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचला पाटील यांच्यावर शिस्तभंगाची व माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून संपूर्ण कामकाजाची विभागीय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केली आहे.माळशिरस पंचायत समितीच्या माध्यमातून विकास आराखड्यात असलेल्या अकलूज व इतर आठ गावातील बांधकाम परवान्याची चौकशी करण्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी १६/१०/२०२० रोजी आदेश दिले होते. चौकशी अधिकारी म्हणून एम.एस.बेळळे यांची नियुक्ती करण्यात आली होती.चौकशी अधिकारी बेळळे यांनी चौकशी पूर्ण करून अहवाल उपमुख्यकार्यकारी चंचला पाटील यांच्याकडे सादर करून अनेक महिने झाले आहेत,चौकशी मध्ये गटविकास अधिकारी दोषी आढळून आल्याची शक्यता निर्माण झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी नमूद केले आहे.

माळशिरस तालुक्याच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्यावर कारवाई होवू नये या उद्देशाने उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचला पाटील या माळशिरस गटविकास अधिकारी यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. गटविकास अधिकारी यांच्या कार्यकाळातील बांधकाम परवाण्याच्या झालेल्या चौकशी बाबत दोष निश्चित करून कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.

माळशिरस तालुक्यातील स्वतःच्या मर्जीतील ग्रामपंचायत च्या विरोधात तक्रार केल्यानंतर तक्रारदार यांचे अर्ज शासन परिपत्रक क्र.शाकाप/२०१५ प्र.क्र.५/१८(र.ल.का.) ता.२५/०२/२०१५ नुसार दप्तरी दाखल करण्यात आले आहेत. मात्र वरील शासन निर्णयानुसार त्यांनी माळशिरस तालुक्यात हजर झाल्यापासून एकही अर्ज दप्तरी दाखल केला नसल्याची माहिती त्यांच्याच कार्यालयाकडून देण्यात आली आहे,त्यामुळे माळशिरस गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी पक्षपातीपणा केल्याचे दिसून आले आहे.तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटील यांनी अकलूज व इतर आठ गावातील बांधकाम परवाण्याच्या चौकशी प्रकरणात पाठीशी घालण्याच्या उद्देशाने वेळकाढूपणा केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून माळशिरस गटविकास अधिकारी यांच्या संपूर्ण कामकाजाची विभागीय चौकशी करण्यात येवून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पुणे विभागाचे आयुक्त यांच्याकडे केली असून या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर २१ जून पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा किरण साठे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom