इंदापूर तहसील कार्यालयातील नागरी सेवा केंद्राच्या विरोधात ८ मार्च रोजी बहुजन ब्रिगेडचे आंदोलन
प्रतिनिधी : इंदापूर : इंदापूर तालुक्याचे तहसीलदार यांना बहुजन ब्रिगेड संघटनेचे पुणे जिल्हा संघटक अविराज माने यांनी निवेदन देऊन तहसील कार्यालयात असलेल्या नागरी सेवा केंद्रातील (सेतु) अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तहसील कार्यालयातील नागरी सेवा केंद्र (सेतू) मध्ये अधिकारी प्रत्येक अर्जाच्या प्रति.साठी 100 रुपये घेतात आणि पावती सुद्धा देत नाहीत आशा भरपुर तक्रारी आमच्या संघटनेकडे आल्या आहेत,त्यामुळे आम्ही स्वतः जाऊन हे बघितले तर आमच्या कडून ही प्रतिज्ञापत्र साठी 100 रु घेतले पावती दिली नाही तर आशा कित्येक रोजच्या प्रतिज्ञापत्र वितरित करून लाखो रुपये गोळा होत असतील त्याची चौकशी करून रजिस्टर चेक करून पाहावे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषी असणाऱ्या अधिकारी व सेतू चालक यांचावर त्वरित कारवाई करावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर ८ मार्च रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेडचे पुणे जिल्हासंघटक अविराज माने यांनी दिला आहे.
