‘
अशोका चौक – अकलूज रस्त्यातील खड्डे दुरुस्त करा’
.. अन्यथा #जनसेवासंघटनाच्या वतीने खड्यात बसून आंदोलन करण्यात येईल..
अकलूजमधील अशोका चौक अकलूज येथील रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित दुरुस्ती करा या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांना जनसेवा संघटनेचे कार्यकारणी सदस्य महेश शिंदे यांनी निवेदन दिले आहे.अकलूज हद्दीतील अशोका चौक येथे रस्ता अत्यंत खराब झालेला आहे.रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे झालेले आहेत. अशोका चौक अकलूज शहरातील बायपास असून बायपास वरील रस्त्यामध्ये खड्डे उद्भवल्या मुळे अनेक दुचाकी वाहनांचा अपघात होत आहे. व वारंवार तक्रार करूनही तात्पुरते मुरूम टाकून ते बुजवण्यात येतात परंतु ते मुरूम टाकून न बुजवता तिथे डांबरीकरण झाले पाहिजे.व संबंधित कॉन्ट्रॅक्ट दारावर निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे कारवाई करावी असे निवेदन अकलूज बांधकाम विभाग यांना देण्यात आले.येणाऱ्या दहा दिवसात जर रस्त्याचे काम न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा #जनसेवा_संघटने तर्फे इशारा देण्यात आला.
