अकलूज नगरपालिका असो अथवा ग्रामपंचायत मनसे निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार–सुदाम आवारे
प्रतिनिधी–अकलूज–अकलूज ची निवडणूक ही मनसे पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे यांनी सांगितले.
अकलूज ग्रामपंचायत चे नगरपालिकेत रूपांतर होऊन नगरपालिका अस्तित्वात आल्यास किंवा अकलूज ग्रामपंचायत कायम राहिली तरी मनसे दोन्ही पद्धतीने निवडणूकीला तयार असून अकलूजमध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या अजूनही जश्याच्या तश्याच आहेत,जानेवारी महिन्यात या निवडणूका होण्याची शक्यता असून या अकलूजमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असून अनेक विकास कामे झाली नाहीत,कचऱ्याचा प्रश्न,कारखान्यातून नदीत सोडण्यात येणाऱ्या घाण पाण्याचा प्रश्न आहे,त्यामुळे सर्वसामान्य जनतेला हवेच्या प्रदूषनला बळी पडावे लागत आहे,त्यामुळे नीरा नदीही दूषित होताना दिसत आहे,यासह अनेक प्रश्नांची यादीच आमच्याकडे आली असून या मुद्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
अकलूज ग्रामपंचायत चे नगरपालिका मध्ये रूपांतर करण्यात यावे या मागणीसाठी तत्कालीन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व सद्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी मोठया प्रमाणावर जनआंदोलन उभा केले होते,अकलूज ग्रामपंचायतचे नगरपालिका मध्ये रूपांतर झाल्यास त्यांचाही या प्रक्रियेत सिंहाचा वाटा असेल आणि यामध्ये मनसेचा ही सहभाग असल्याने आम्ही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश मिळवणार आहे,असा विश्वास सुदाम आवारे यांनी व्यक्त केला.
