
RBI,केंद्र सरकार,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,बांधकाम मंत्री यांचे आभार–किरण साठे
प्रतिनिधी—सोलापूर–सोलापूर जिल्ह्यातील मध्यमवर्गीय व गोरगरीब जनतेने मायक्रोफाईनान्स,बचत गट,पतसंस्था,इतर बँका यांच्या व इतर विभागाच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी वाढीव दोन महिन्याचा कालावधी मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी लावून धरली होती,गेली अनेक दिवस ते या मागणीचा पाठपुरावा करीत होते,त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,तसेच बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे,पंढरपूर चे आमदार भारत भालके यांनीही या विषयावर आवाज उठवला होता,त्यांनीही याचा पाठपुरावा केला आहे,
मी कालच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका ईमेलद्वारे ही मागणी केली होती.असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील मायक्रोफायनान्स,बचत गट, पतसंस्था व इतर बँकेच्या व आठवडा बचत गटाची कर्ज मध्यमवर्गीय व गोरगरीब जनतेने घेतली आहेत व त्याची जबरदस्तीने वसुली केली जात आहे,कोरोना साथीच्या रोगाला प्रतिबंध करणे साठी संपूर्ण देशात लॉक डाऊन व संचारबंदी केली असल्याने मध्यम वर्गीय व गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळने शक्य नाही,त्यामुळे या गरीब लोकांनी काढलेले बचत गट,आठवडा मायक्रोफाईनान्स,पतसंस्था,इतर बँका अनेक विभागा मार्फत घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दोन महिने वेळ व कालावधी देण्यात यावा,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी मागणीमध्ये नमूद केले होते.

मात्र RBI ने सर्व प्रकारच्या कर्जाचे हप्ते वसुलीसाठी ३ महिने स्थगिती दिली असल्याचे स्पष्ट केले आहे. RBI ने सर्व प्रकारच्या कर्जाची हप्ते वसुलीला ३ महिने स्थगिती दिली असल्याने मी केलेल्या प्रयत्ननाला यश आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले आहे.

हे माझ्या एकट्याच्या प्रयत्नमुळे झालेले नसून यामध्ये केंद्र सरकार,काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री,शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे,यांनीही आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून पाठपुरावा केल्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगून त्यांच्याबरोबर ज्या लोकप्रतिनिधी व विविध संघटनेच्या माध्यमातून ही मागणी करणाऱ्या पदाधिकारी यांचेही आभार मानत असल्याचे किरण साठे यांनी सांगितले.