
मारकडवाडी ग्रामपंचायतच्या वतीने औषध फवारणी:-अमित वाघमोडे-पाटील
मारकडवाडी या गावांमध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामपंचायतीने जंतुनाशक औषध फवारणीचा उपक्रम राबवला गावामध्ये येणारे रस्ते गल्ल्या आणि गावातल्या सर्वच ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर औषध फवारणी करण्यात आली तसेच स्पीकरने पूर्ण गावामध्ये कोरोना संदर्भात जनजागृती केली कोरोना सोबतच इतर कोणतीही रोगराई गावात फिरकू नये यासाठी हे औषध फवारणी करण्यात आली बाहेरून येणाऱ्या सर्व नागरिकांची नोंद केली जात आहे बाहेरून आलेल्या नागरिकांनी आपली नोंद मारकडवाडी ग्रामपंचायत कार्यालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र मारकडवाडी येथे करावी असे ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांना आव्हान करण्यात आले नागरिकांनी घराबाहेर घडू नये यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत त्यासाठी नागरिकांचे सहकार्य होत आहे नागरिकांना काही मदत लागल्यास ग्रामपंचायत मध्ये सूचना करावी व ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे ग्रामपंचायत मारकडवाडी सरपंच अमित वाघमोडे पाटील सर्व सदस्य व नागरिक यांनी सांगितले. यावेळी सरपंच अमित वाघमोडे पाटील, ग्रामसेवक सागर गोरे,क्लार्क शामराव शेंडगे,मारकडवाडी येथील प्रसिद्ध बागातदार सचिन नाना वाघमोडे पाटील औषध फवारणी दरम्यान उपस्थित होते.