
जनतेनेच्या निष्काळजीपणा मुळे सरकारला संचारबंदी लागू करावी लागली—किरण साठे
प्रतिनिधी—निमगाव—देशासह महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत असताना या राज्यातील जनता या कोरोना आजराला गंभीरपणे घेताना दिसत नाही,जनतेच्या या निष्काळजीपणा मुळे या राज्याला मोठी किंमत मोजावी लागेल यांची खबरदारी सर्वसामान्य जनतेने घेणे गरजेचे आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी सांगितले.
हा आजार झपाट्याने वाढत असताना महाराष्ट्र शासनानने राज्यातील जनतेला केलेल्या सूचनांचे पालन करताना जनता दिसून येत नाही,याचा फटका हा संबंधित जी व्यक्ती शासनाच्या सूचनांचे पालन करणार नाही त्याला,त्याच्या कुटुंबातील व संपर्कात येणाऱ्या प्रत्येक सदस्यांना बसणार आहे,
त्याचवेळी याचा बोजा हा सरकारी यंत्रणेवर ही येणार आहे.त्यामुळे या कोरोना व्हायरस चा सामना करायचा असेल तर त्याचे प्रयत्न आपण आपल्या स्वतःपासून केले पाहिजेत,उगाच शासनाने केलेल्या सूचना न पाळता आपण कुठेही वावरायला लागलो तर कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होईल याची जाणीव आपण योग्य प्रमाणात घेतलीच पाहिजे.
राज्यामध्ये जमावबंदी केलेली असतानाही अनेक ठिकाणी जनता स्वतःच्या गाडीमध्ये बसून प्रवास करताना दिसत आहे,ही कश्याची लक्षणे समजायची अति शहाणपणाची की बालिशपणाची की शासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांची पायमल्ली करणयाची या अशा लोकांनी शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असताना मोकाट फिरणे चुकीचे आहे, जमावबंदी सारख्या आदेशाला आपणच केराची टोपली दाखवणे म्हणजे आपणच या कोरोना आजराला खतपाणी घालण्यासारखा प्रकार करीत आहे,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य सरकारने सद्या जमाव बंदी केलेली असताना आपण या गोष्टीची गंभीरपणे दखल घेणे गरजेचे असताना जनतेने गंभीरपणे न घेतल्याने महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारला ना इलाजाने राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यासाठी भाग पाडले आहे.
आपण सर्वांनी मिळून या महाविकास आघाडी सरकारच्या सूचनांचे पालन करून या कोरोना आजराला हद्दपार करून लावू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील जनतेला केले आहे.