
स्वयंभू च्या वतीने नुतन पोलिस उप निरीक्षक अश्विनी कांबळे यांचा सत्कार
प्रतिनिधी :- स्वयंभू फाऊंडेशन च्या वतीने अध्यक्ष संतोष भाऊ हरपळे यांच्या हस्ते नुतन पोलिस उपनिरीक्षक कु.अश्विनी वसंत कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
फुरसुंगी येथील भेकराईमाता हायस्कूल मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली पापडेवस्ती येथील सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी कु अश्विनी कांबळे हीने अभ्यासाच्या जोरावर उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली त्या मुळे फुरसुंगी येथील ढमाळवाडी पापडेवस्ती येथील नागरिकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले या वेळी स्वयंभू फाऊंडेशन चे अध्यक्ष मा.संतोष भाऊ हरपळे यांनी कु अश्विनी कांबळे यांचा सत्कार करून पुढे पाहीजेल ती मदत करण्याचे अश्वासन दिले. या वेळी उद्योजक राहूलशेठ ढमाळ, महेंद्रशेठ हरपळे, आकाश हरपळे, पप्पूशेठ जगताप,संदेश कुंजीर,आण्णा सुर्वे, संगमेश्वर सुतार,प्रवीण काळे, कैलास भिसे,संतोष चाकूरे,तानाजी पाटील,व स्वयंभू फाऊंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.