
माळशिरस वनपरिक्षेत्र कार्यालय माळशिरस येथे वृक्षारोपण करून जागतिक वन दिन साजरा
प्रतिनिधी–माळशिरस—माळशिरस वनपरिक्षेत्र कार्यालय येथे जागतिक वन दिन वृक्षरोपण करून साजरा करण्यात आला जागतिक वन दिन साजरा करण्याची मूळ संकल्पना दृष्टीआड असलेल्या सृष्टी चे महत्व मानवाला न समजावण्याचे हे अगदी उघड उदाहरण म्हणता येईल शुद्ध हवा पिण्याचे पाणी आणि इतर अनेक बाबी आपल्याला मिळतात त्या जंगला मुळेच मात्र चंगळवादी जीवनशैली साठी केल्या जाणाऱ्या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याने 1970च्या दशकात जाणवू लागले त्यातूनच जंगले वाचण्याची संकल्पना पुढे आली संयुक्त संघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी हा वर्ल्ड फॉरेस्ट डे साजरा करण्यास सुरुवात केली तसेच सर्वांनाच माहिती होण्यासाठी सरकार आणि विविध संस्था वेगळे उपक्रम उपक्रम राबवू लागले अनावश्यक जंगलतोड टाळणे अधिक झाडे लावणे जंगलापासून मिळणारी उत्पादने आणि होणारे फायदे जंगलांना सतत भेट दिल्याने मिळणारी माहिती अशा कारणाने 21 मार्च रोजी जागतिक वन दिन साजरा केला जातो याच अनुषंगाने माळशिरस येथे जागतिक वन दिन वृक्षरोपण करून साजरा केला यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शेख साहेब,वन परिमंडळ अधिकारी माळशिरस आगरकर साहेब, वन परिमंडळ अधिकारी पिलीव लडकत साहेब, वनरक्षक मुंडे,वनकर्मचारी सतीश घाडगे, बाळासाहेब बनकर, शेलार अधिक कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.