
मारकडवाडी कदमवाडी येथील ओढ्यामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना पोलीस प्रशासन वर्दीचा धाक दाखवणार का?–सचिन रणदिवे
मौजे माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी,कदमवाडी गावातून नीरा नदी कडे जाणारा ओढ्यामध्ये अवैद्य वाळू उपसा केला जातोय वाळू उपसा करण्याच्या पाठीमागे नेमके महसूलच्या अधिकाऱ्यांचे हात आहेत की काय याची दाट शक्यता माळशिरस तालुक्यामध्ये लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे नेमके किती जणांचे हात या वाळू तस्करांच्या डोक्यावरती आहेत कोणाच्या सांगण्यावरून हा वाळू उपसा सुरू आहे निसर्गाचा समतोल ढासळत आहे याला जबाबदार कोण अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला व गावांना धोका निर्माण होतोय कारण कारण ठिकाणचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे ज्या ठिकाणी वाळू उपसा सुरू आहे त्या ठिकाणाहून काही शेतकरी वर्गांचे ठिकठिकाणचे विहिरीचे पाणी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठे नुकसान होत आहे तसेच ये जा करणाऱ्या करण्यासाठी हे वाळूतस्कर शेतकरी वर्गाच्या त्या रस्त्यालगत असणारे पाईप बघत नाहीत काय नाही उलट शेतकरी वर्गाची पाण्याची पाईप जरी फुटली तरी मागेपुढे न बघता दमदाटी, शिवीगाळ करून निघून जातात याला आळा बसणार का ज्या ठिकाणी वाळू उपसा केला आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी वाळू उपसा सुरू आहे त्या ठिकाणचा पंचनामा करून वाळू उपसा करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करणार का असा प्रश्न माहिती सेवाभावी संस्था चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन रणदिवे यांनी उपस्थित केला आहे.
माळशिरस तालुक्यात सह कदमवाडी,मारकडवाडी मध्ये चर्चेला उधाण आले आहे. कारण लोक भीतीपोटी या गोष्टी कडे दुर्लक्ष करत आहेत कारण ज्यांनी कोणी आवाज उठवला वाळू तस्कर मनगटशाही चा वापर करून दमदाटी करून त्यांच्याशी भांडण काढून त्या लोकांना मारहाण करतात हेच त्या वाळूतस्करांचे काम आहे त्यामुळे त्यांच्या नादी कोणीही लागत नाही म्हणून पोलीस अधिकारी आपल्या खाकीचा धाक अशा वाळू तस्करांना कधी दाखवणार असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. म्हणून या वाळु तस्करांना वेळेवरच योग्य ती कारवाई करून मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी माळशिरस तालुक्यामध्ये चर्चेला उधान आले आहे आणि याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.संबंधित विषयावर शासनाने कडक कारवाई करून संबंधित वाळू माफियावर मोक्का अंतर्गत कारवाई नकेल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा सचिन रणदिवे यांनी दिला आहे.