उप अभियंता ग्रामीण पुरवठा उपविभाग माळशिरस पंचायत समिती माळशिरस यांच्या मनमानी कारभाराला कधी आळा बसणार:-शामराव बंडगर

प्रतिनिधी—माळशिरस—पंचायत समिती माळशिरस यांनी तिरवंडी ग्रामपंचायत अंतर्गत शोष खड्डे चे काम निकृष्ट झाले बाबत अशी चौकशी प्रकरणे क्रमांक 49 2020 प्रथम प्राधान्य अशा आशयाचे पत्र उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पंचायत समिती माळशिरस यांना काढण्यात 24/ 2/ 2020 रोजी काढण्यात आले होते.

तक्रारदार श्री शामराव बलभीम बंडगर राहणार तिरवंडी यांचा 26/ 2/ 2019 रोजी चा अर्ज कार्यालयात प्राप्त झालेल्या असल्याकारणाने गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांनी पत्र बाबत चौकशी करून अहवाल सात दिवसात सादर कार्यालयास तात्काळ सादर करावा याबाबत विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा आशयाचे पत्र उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पंचायत समिती माळशिरस यांना काढून देखील यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याकारणाने अशा अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करून निलंबित करावे या मागणीसाठी शामराव बंडगर लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत असे त्यांनी बोलताना सांगितले जोपर्यंत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहणार दिनांक 5/ 4/ 2020 रोजी पासून बेमुदत उपोषणास बसणार असे त्यांनी बोलताना सांगितले.