वेळापूर येथील डी फोर कॅनॉलच्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठीराष्ट्रवादी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

वेळापूर येथील डी फोर कॅनॉलच्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठीराष्ट्रवादी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी—माळशिरस—वेळापूर येथील डी फोर कॅनॉलच्या कामची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी यांना त्वरित निलंबित करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावे या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी लघु पाटबंधारे विभाग क्र १ वारणा डावा तीर कालवा उपविभागीय क्र ३ माळशिरस चे उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन केले आहे. सदर आंदोलनाचे निवेदन उपविभागीय अधिकारी श्री धायगुडे साहेब यांनी स्वीकारले सदर निवेदनाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी धायगुडे साहेब यांनी दिलेले उत्तर हे संबंधित ठेकेदाराला पाठिशी घालण्याच्या हेतूने कोणतीही चौकशी न करता दिलेले आहे,त्याच्या निषेधार्थ संबंधित कामाची चौकशी करून संबंधित उपविभागीय अधिकारी धायगुडे साहेब व जबाबदार अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी २३ मार्च रोजी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पंढरपूर यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी देऊन तसे संबंधित निवेदन धायगुडे साहेब यांना दिले आले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,बहुजन ब्रिगेडचे जिल्हा सचिव ऋषीपाल बनसोडे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मोरे,कोळी महासंघाचे अध्यक्ष सागर कोळी,आदित्य काकडे,साहिल अडगळे, मोहसीन शेख इत्यादि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom