धर्मवीर सदाशिवराव माने पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडच्या वतीने अभिवादन

प्रतिनिधी—अकलूज—धर्मवीर सदाशिवराव माने पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडच्या वतीने सदुभाऊ चौक येथील त्यांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पिंटू एकतपुरे, कोळी महासंघाचे अध्यक्ष सागर कोळी,सूरज मोहिते इत्यादी उपस्थित होते.
धर्मवीर सदाशिवराव माने पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रत्येक वर्षी शिख शिंगणापूर येथून ज्योत आणण्यासाठी अनेक युवक जात असतात,त्याठिकानाहून ज्योत आणून अकलूजमध्ये सदुभाऊ चौक येथील त्यांच्या स्मरकासमोर आणली जाते,या सर्व कार्यक्रमाचे आयोजन संबंधित जयंती उत्सव समिती करीत असते,या सर्व कार्यक्रमाचे नियोजन त्यांचे वंशज सुजय माने पाटील हे अनेक वर्षे झाली करीत आहेत.