
कृतीशील विचारांचे गतीशील नेते आदरणीय अजित दादा पवार साहेब – पै.अक्षय भांड (युवानेते राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुका)
प्रतिनिधी—नातेपुते—भाजप सरकारच्या काळात शेतकरी वर्ग पुर्ण पणे कोलमडून गेला व पाच वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांनच्या हिताचे कोणते ही निर्णय घेतले नसल्याने शेतकरी पुर्ण पणे हवालदिल झाल्याचे चित्र संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये दिसुन येत होते पण महाविकास आघाडी सरकार येताच शेतकऱ्यांनच्या कर्ज माफीची घोषणा करूण शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचे काम या सरकारने केले व आत्ता शेतकऱ्यांनचे २ लाखा पर्यंतचे कर्ज माफ होण्यास सुरूवात झाली आहे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार साहेब यांनी शब्द दिल्या प्रमाणे शेतकऱ्यांना कोणत्याही नियम व अटी शिवाय कर्ज माफीचा लाभ होत असल्याचे दिसत आहे कृतीशील विचारांचे गतीशील नेते आदरणीय अजित दादा पवार असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला चांगले दिवस नक्कीच येतील व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतले जातील
तसचे पै.अक्षय भांड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांच्या समवेत मांडवे गावातील कर्जमाफी चा लाभ मिळालेल्या शेतकरी वर्गा सोबत चर्चा केली या वेळेस पै.अक्षय भांड मित्र परिवार, निलराज शिंदे मित्रपरिवार, व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते