
अखेर किरण साठे यांच्या आंदोलनाला मिळाले यश
आज२४तास–प्रतिनिधी–अकलूज—मळोली ते निमगाव रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावे व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी २४ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे मुख्य अभियंता यांच्या कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
सदर आंदोलनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांनी संबंधित मळोली ते निमगाव या रस्त्याच्या कामाची पाहणी करून ते काम शासनाच्या नियम,अटी,शर्ती,व या कामामध्ये वापरण्यात येणारे साहित्य शासकीय प्रयोग शाळेतून तपासून वापणार असल्याचे लेखी पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांना दिले असल्याने व काम निविदा प्रमाणे करण्याचे आश्वासन बांधकाम विभागणे दिले आहे, त्यामुळे माझ्या आंदोलनाला यश आले असल्याचे किरण साठे यांनी सांगितले.तसेच २४ फेब्रुवारी रोजी होणारे आंदोलन स्थगित करीत असल्याचे सांगितले.