महाराष्ट्र विकास सेना’चा थेट मंत्रालयात धडक देऊन मुख्यमंत्र्यांकडे प्रकल्प रद्द करण्याची मागणी,

उजनी धरण पाणी बचाव लढा: ‘काकोडकर समिती’ बरखास्त करून एआय (AI) प्रकल्पाचा अहवाल सार्वजनिक करा!

अकलूज: उजनी धरणाच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या सुमारे १.६५ लाख कोटी रुपयांच्या प्रस्तावित ‘एआय (AI) डेटा सेंटर व ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाच्या विरोधात ‘महाराष्ट्र विकास सेना’ पक्षाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. या विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने थेट मुंबईत मंत्रालय गाठून राज्य सरकारच्या सर्वोच्च स्तरावर धडक दिली. मा. मुख्यमंत्री, मा. उद्योग मंत्री आणि मा. जलसंपदा मंत्री यांना या प्रकल्पाच्या विरोधात कायदेशीर आणि तीव्र जनभावना मांडणारे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, या पाणी बचाव लढ्याला अधिक बळ देण्यासाठी पक्षाने रस्त्यावरील लढाईची मोठी तयारी सुरू केली आहे.या निवेदनात पक्षप्रमुख किरण साठे यांनी सरकारचा छुपा डाव उघडा पाडला असून, या प्रकल्पाबाबत शासन आणि खाजगी कंपन्यांमध्ये झालेले सामंजस्य करार , तांत्रिक आराखडे, पाण्याचा वापर आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा (EIA) संपूर्ण अधिकृत अहवाल प्रशासनाने लपवून न ठेवता तात्काळ सार्वजनिक करावा, जेणेकरून या प्रकल्पामागील गुप्तता आणि लपवाछपवी जनतेसमोर येईल.६८० एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या या एआय डेटा सेंटरच्या महाकाय सर्व्हर्सना थंड ठेवण्यासाठी दररोज लाखो-कोट्यवधी लिटर पाणी थेट उजनी धरणातून कायमस्वरूपी औद्योगिक कारणांसाठी उपसले जाणार आहे, ज्यामुळे सोलापूरसह तीन जिल्ह्यांतील शेतीचे आणि पिण्याच्या पाण्याचे हक्काचे आवर्तन बुडून भीषण टंचाई निर्माण होईल.धरणाच्या मुख्य जलपृष्ठावर तब्बल ३ हजार हेक्टर क्षेत्रावर बसवल्या जाणाऱ्या तरंगत्या सौर पॅनेल्समुळे पाण्यात सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजन पोहोचणे पूर्णपणे बंद होईल.परिणामी, धरणातील मत्स्यसृष्टी नष्ट होऊन यावर उदरनिर्वाह करणारी हजारो मच्छीमार कुटुंबे कायमची बेरोजगार होतील.डेटा सेंटर्समधून बाहेर पडणारी प्रचंड उष्णता आणि सौर पॅनेल्सच्या प्रभावामुळे स्थानिक पर्यावरणाचे तापमान कमालीचे वाढेल. तसेच महाकाय बॅटरी साठवणूक आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे धरणाचे शुद्ध पाणी रासायनिकदृष्ट्या दूषित होऊन कोट्यवधी जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होईल.या प्रकल्पाच्या तांत्रिक मूल्यमापनाच्या नावाखाली स्थापन करण्यात आलेली ‘काकोडकर समिती’ तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात यावी आणि स्थानिक शेतकरी व जनतेला अंधारात ठेवून सुरू असलेले तिचे अंतर्गत काम तातडीने बंद करण्यात यावे.या निवेदनाच्या अधिकृत प्रती पुढील आवश्यक कायदेशीर कार्यवाहीसाठी सोलापूर व पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनाही रवाना करण्यात आल्या आहेत.या अन्यायकारक प्रकल्पाची शासकीय प्रक्रिया तात्काळ रोखण्यासाठी, प्रकल्पाचा अहवाल जाहीर करण्यासाठी आणि उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या समस्त नागरिकांच्या हक्कासाठी येत्या ३१ ऑक्टोबर रोजी माढा तालुक्यातील रांजणी येथे राष्ट्रीय महामार्गावर भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्यात येत आहे. महाराष्ट्र विकास सेना पार्टीच्या वतीने या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला असून, पक्षाचे कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी , आजी-माजी लोकप्रतिनिधी या आंदोलनात प्रमुख संख्येने रस्त्यावर उतरणार आहेत. सरकारने वेळीच हा विनाशकारी प्रकल्प थांबवला नाही,तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तीव्र ‘उजनी धरण व पाणी बचाव जनआंदोलन’ पेटेल आणि त्यातून उद्भवणाऱ्या संपूर्ण परिणामांची जबाबदारी केवळ शासन व प्रशासनाची राहील, असा थेट आणि खंबीर इशारा पक्षप्रमुख किरण साठे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom