
भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराची होणार गोची!
प्रतिनिधी माळीनगर जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेला असून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंद्र पवार पक्ष भारतीय जनता पार्टी तसेच महाराष्ट्र विकास सेना पार्टी या तीन प्रमुख पक्षांमध्ये लढत होणार असून महाराष्ट्र विकास सेना पक्षाने माळीनगर जिल्हा परिषद गटांमध्ये आणि लवंग पंचायत समिती गणामधे प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे माळीनगर जिल्हा परिषद गटातील खंडाळी,संगम,लवंग वाघोली,माळीनगर,बाभूळगाव या गावांमध्ये गाव भेट दौरा केला असता या गाव भेट दौऱ्यामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे उमेदवार श्री ज्ञानेश्वर नाईक नवरे यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे नुकताच त्यांनी माळीनगर वाघोली,खंडाळी या गावांमध्ये गावभेट दौरा केला आहे. मतदारांमधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या जिल्हा परिषद गटामध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे माळीनगर जिल्हा परिषद गटांमध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या अनेक गावांमध्ये शाखा असून या शाखेच्या माध्यमातून प्रत्येक गावात घर टू घर फिरून प्रचार करण्याचे काम कार्यकर्त्याच्या माध्यमातून सुरू झाले आहे या प्रचाराचा अनुशेष पाहता महाराष्ट्र विकास सेना पक्ष सध्या प्रचारामध्ये आघाडीवर आहे,ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व भारतीय जनता पार्टी यांना अवघड जाणार असल्याचे दिसून येत आहे,महाराष्ट्र विकास सेना पक्षाने प्रचारात आघाडी घेतल्याने दोन्ही पक्षांची गोची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे,सध्या तरी प्रचारामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्ष अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.आणि त्यांना वाढता प्रतिसाद दिसत आहे.