मांडवे जिल्हा परिषद गटातील महार/बौद्ध समाज एकवटणार ?आनंद मिसाळ यांना देणार मोठे मताधिक्य!

मांडवे जिल्हा परिषद गटातील महार/बौद्ध समाज एकवटणार ?आनंद मिसाळ यांना देणार मोठे मताधिक्य!

प्रतिनिधी :

महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे मांडवे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आनंद मिसाळ हे स्वतः महार/बौद्ध समाजाचे आहेत,त्यांच्या पाठीमागे मतदार संघात असलेला महार/बौद्ध समाज उभा राहणार असल्याची चर्चा संपूर्ण माळशिरस तालुक्यातील महार/बौद्ध समाजामध्ये चालू आहे.बौद्ध समाजाला खुल्या प्रवर्गामधून उमेदवारी दिल्याने महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे महार/बौद्ध समाजातून कौतुक केले जात आहे,खुल्या प्रवर्गामध्ये कधीही या माळशिरस तालुक्यामध्ये महार/बौद्ध समाजाला समाजाला कोणत्याही पक्षाने आजपर्यंत उमेदवारी दिली नसल्याने महाराष्ट्र विकास सेना पक्षाने ही किमया घडवून आणल्याने मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये महार/ बौद्ध समाज हा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पाठीमागे उभा राहणार असल्याची ग्वाही अनेक महार/ बौद्ध समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी दिली आहे,त्यामुळे मांडवे जिल्हा परिषद गटाची निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोपी राहिलेले नाही,त्यामुळे बौद्ध/महार समाजाचे मताधिक्य हे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पारड्यामध्ये पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून महार/बौद्ध समाजाचा निर्णय हा ऐतिहासिक ठरणार असून आनंद मिसाळ यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.

मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये असलेल्या महार व बौद्ध समाज हा आमच्या समाजाचा घटक असलेल्या महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे उमेदवार आनंद मिसाळ यांच्याच पाठीशी उभा राहणार आहे,महाराष्ट्र विकास सेना पक्षाने खुल्या प्रवर्गामधून आमच्या समाजाला उमेदवारी दिली असल्याने आम्ही त्यांचे आभार मानतो आहे,नक्कीच निवडणूकीत महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पाठीमागे महार व बौद्ध समाज खंबीरपणे उभा राहणार आहे, माळशिरस तालुक्यातील इतर आमच्या समाजातील पुढाऱ्यांचे या मतदारसंघात असलेली जनता ऐकणार नाही.ती फक्त खुल्या प्रवर्गामधून आमच्या समाजाला उमेदवारी देणाऱ्या महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पाठीमागेच उभा राहील.

बापूसाहेब वाघमारे – नेते – महाराष्ट्र विकास सेना पार्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom